शिधापत्रिका धारकांनी आधारकार्ड आपल्या शिधापत्रिकेची जोडणी करून घ्यावी – गोरे
उदगीर (एल.पी. उगिले) : अन्न, नागरी व पुरवठा मंत्रालयाच्या सार्वजनीक वितरण व्यवस्थेमार्फत धान्य वितरण करण्यात येते. उदगीर तालुक्यातील अन्नधान्य वितरण प्रणालीच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांचे आधार सीडींग करावयाचे प्रलंबित राहिले आहे. व शासन स्तरावरुन सततचा पाठपुरावा करुनही १००% आधार सिडींग होत नसल्याने, रास्त भाव दुकानदार यांचे मार्फत ई-पॉस मशीन द्वारे विशेष कॅम्प मोहिम राबवण्यात येणार आहे.सदरील मोहिम ग्राम पातळीवर दक्षता समिती सदस्याच्या बैठकांद्वारे तसेच मंडळ निहाय तलाठी सज्जा निहाय नोडल अधिकारी व पर्यवेक्षक म्हणुन तलाठी व मंडळ अधिकारी यांची नेमणुक करुन यशस्वी करण्यात येणार आहे.उदगीर तालुक्यातील अन्नधान्य वितरण प्रणालीचे १००% आधारचे व EKYC चे काम पुर्ण करण्याचे निश्चीत करण्यात आले आहे.या मोहिमेपुर्वी गावोगावी दवंडी व सोशल मीडीया द्वारे प्रसिध्दी देण्यात येत आहे.उदगीर तालुक्यात २१ सप्टेंबर २०२२ रोजी रास्त भाव दुकान स्तरावर विशेष कॅम्प आयोजित करण्यात येत आहे .तरी याद्वारे उदगीर तालुक्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांचे कोणाचे शिधापत्रीकेस आधार जोडणी करावयाचे प्रलंबित असेल त्यांनी विशेष कॅम्प मध्ये सहभागी व्हावे. व १००% आधार सिडींग साठी सहकार्य करावे असे आवाहन पुरवठा नायब तहसीलदार श्री शिवशंकर बेंबळगे व तहसीलदार श्री रामेश्वर गोरे यांनी केले.
