बाळासाहेब जाधव साहेबांच्या दुरदृष्टीमुळे महेश अर्बन बँकेची प्रगती – आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : राजकारण करत असताना अर्थकारण करणे हे काही साधारण माणसाचे काम नसुन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची दूरदृष्टी,संचालक मंडळाचे कुशल नेतृत्व,कर्मचाऱ्यांची ग्राहकांसोबत आपुलकीची वागणुक,व जाधव साहेबांच्या दुरदृष्टीमुळे महेश बँकेच्या प्रगतीचा आलेख प्रत्येक वर्षी वाढत असल्याचे प्रतिपादन आ.बाबासाहेब पाटील यांनी दि.१९ रोजी दिपवर्षा मंगल कार्यालयात महेश अर्बन को.ऑप.बँकेच्या २९ व्या वार्षीक सभेत अध्यक्षक्षीय समारोपात केले.
यावेळी व्यासपिठावर सभापती तथा जेष्ठ संचालक शिवानंद हेंगणे, प्रा.गणपतराव माने, डॉ.अशोक सांगलीकर, शिवाजीराव देशमुख, नवनिहालसिंग जहागिरदार, टी.एन.कांबळे, माधवराव जाधव, तुकाराम पारवे, बळीराम भिंगोले, अंकुशराव कानवटे, उपाध्यक्षक्ष निवृत्ती कांबळे, सुदर्शन मुंडे, डि.के.जाधव, शिवाजी खांडेकर, आर.एन.वलसे, शेषेराव मुंजाने, मुजीब पटेल जहागीरदार, अजहर बागवान, बालासाहेब पाटील अंबेगावकर, प्रशांत भोसले, इमरोज पटवेकर, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, नागोराव पाटील, अभय मिरकले, प्रदीप जाधव, विनायक भोसले, सतिश कल्याण, अशौक गादेवार,पुरुषोत्तम पुरोहित, सत्यकला जाधव, संगीता खंडागळे, मनिष काबरा, धनंजय दारफळकर, सिद्रम रंदाळे, प्रशांत मांडवकर, देवेंद्र जाधव, आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की, बँकेच्या मुख्य शाखेसह इतर ठिकाणी पंधरा शाखा असुन. त्या प्रत्येक शाखेत ठेवी तसेच कर्ज वाटप करताना रिझर्व्ह बँकेने घालुन दिलेल्या नियमानुसार होत असत.बँकेने पुर्वीपासुनच गरज असलेल्या छोट्या मोठ्य व्यावसायिकांना कर्ज देऊन त्यांचा आर्थीक विकास घडवून आणण्यास हातभार लावला आहे.कष्टकरीऱ्यांशी आमची वेळोवेळी सामाजीक बांधीलकी राहीलेली आहे.म्हणून सर्वसामान्य माणसांची आर्थीक क्षमता वाढवण्यासाठी बँक मोलाचे सहकार्य करत असून प्रत्येक शाखेतील बॅंकेच्या खुर्चीला कार्यक्षम कर्मचाऱ्यांची तसेच अधिकाऱ्यांची नेमणूक करुन आम्ही बँकेसह दुध डेअरी, साखर कारखाना, सक्षमपणे चालवत असल्याचे सांगितले.विरोधक उगाच बिन कामाच्या डरकाळ्या फोडत आहेत.पण आम्ही चालवत असलेल्या सामाजिक कामामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा, पशुपालकांचा विकासच होत असुन सर्वसामान्यांच्या जिवनात आर्थीक वाढ होताना दिसुन येत आहे त्यामुळे हरीत क्रांतीचे स्वप्न साकार होत आहे. यावेळी डॉ. अशोक सांगलीकर, अड.टी.एन.कांबळे, यांची समयोचित भाषणे झाली.वार्षीक सभेचे प्रास्ताविक सिद्राम रंदाळे यांनी करुन विषय पत्रिकेचे वाचन केले. उपाध्यक्षक्ष निवृत्ती कांबळे यांनी अहवाल वाचन केले.सुत्रसंचलन मारोती बुद्रुक यांनी केले तर आभार सभापती शिवानंद हेंगणे यांनी मानले.
