अतनूर पशुसंवर्धन दवाखाना क्षेणी-२ गावांतर्गत गोठा स्वच्छता फवारणी !

अतनूर पशुसंवर्धन दवाखाना क्षेणी-२ गावांतर्गत गोठा स्वच्छता फवारणी !

अतनूर (प्रतिनिधी) : पशुधनामध्ये विशेषत: गोवंशीय प्राण्यामध्ये लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील काही गावांमध्ये आढळून आला आहे. जिल्हा प्रशासन व पशुवैद्यकीय विभागामार्फत मोठया प्रमाणात लम्पी आजारावर नियत्रंण मिळविण्यासाठी उपाययोजना व दक्षता घेतली जात आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी याबाबत शासनाने आवाहन केल्याप्रमाणे गोठयातील स्वच्छता व बाधित असलेल्या जनावरांना गोठयापासून वेगळे करुन त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरु करावेत, असे आवाहन शासन, प्रशासनाने व पशुसंवर्धन आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, तालुकास्तरीय पशुसंवर्धन कार्यालय पशुसंवर्धन यांनी केलेले आहे. त्याअनुशंगाने अतनूर येथील पशुवैधकिय दवाखाना क्षेणी दोन व तालुकास्तरीय वैधकिय यंत्रणा यांच्या वतीने अतनूर पशुवैधकिय दवाखाना केंद्रांतर्गत अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, रावणकोळा, मरसांगवी, सुल्लाळी, डोंगरगाव, शिवाजीनगर, तांडा-वाडी-वस्ती येथे आयोजित केलेल्या गोठयातील स्वच्छता, फवारणी करण्यात आली. यावेळी तालुका पशुवैधकिय अधिकारी डॉ.सुरेखा नामवाड यांच्या मार्गदर्शनानुसार अतनूरचे पशुवैधकिय पर्यवेक्षक डॉ.बी.बी.मद्रे, पशुपालक विकास सोमुसे-पाटील, प्राणीसंवर्धक प्राणीप्रेमी तथा प्राणीमित्र बी.जी.शिंदे, सेवक एम.एन.शिंदे आदीची उपस्थिती होती. यावेळी पशुवैधकिय दवाखाना अतनूर क्षेणी दोन गावांतर्गत गोठयात औषध फवारणी व जनावरांना औषधे उपचार करण्यात आले. याकामी प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र प्रेमी बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर विशेष सहकार्य करित आहेत. यावेळी जनावरातील साथीच्या आजाराबाबत रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. विशेषत: मोकाट जनावरांचा प्रश्न अधिक गंभीर आहे. ग्रामपंचायतीने यात तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात असे निर्देश शासन यांनी दिले असल्याबाबत डॉ.मद्रे यांनी सांगितले. याचबरोबर गावपातळीवर दंवडी व इतर संपर्काची माध्यमे प्रभावीपणे उपयोगात घ्यावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

साथरोगावर नियंत्रणासाठी सर्व ग्रामपंचायत पातळीवर स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद पशुवैद्यकीय विभाग संबंधित यंत्रणाशी समन्वय साधून आहे. यासाठी औषधोपचाराची कुठलीही कमतरता नसून राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती जळकोट तालुका पशुवैधकिय अधिकारी क्षेणी-१ डॉ.सुरेखा नामवाड यांनी दिली. पशुवैधकिय सहाय्यक डॉ.बी.बी.मद्रे यांनी लम्पी आजाराबाबत अतनूर परिसरातील आढावा सादर केला आहे. यावेळी उपरोक्त गावागावातून लम्पी त्वचा रोगाला रोखण्यासाठी पशुवैधकिय यंत्रणा सरसावली असून अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, मरसांगवी, शिवाजीनगर, भवानीनगर, अतनूरतांडा, तांडा-वाडी-वस्ती परिसरात व गावात पशुवैधकिय यंत्रणेच्या मार्फत जनावरांच्या गोठयात फवारणी केली जात आहे. या गावातील जनावरांच्या आरोग्यावर पशुवैधकिय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. या यंत्रणेमार्फत गावात दररोज जनावरांची पाहणी करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!