पत्रकार सुनील हावा पाटील यांना “समाज भूषण” पुरस्काराने सन्मानित

पत्रकार सुनील हावा पाटील यांना "समाज भूषण" पुरस्काराने सन्मानित

उदगीर(एल.पी.उगीले) लातुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील हावा पाटील यांना नुकताच लिंगायत महासंघ यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “समाज भूषण”पुरस्कार महाराष्ट्रचे माजी गृहराज्यमंत्री तथा आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.

उदगीर येथील पत्रकार सुनील हावा पाटील यांचे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य अत्यंत मोलाचे आहे. समाजाचे हित लक्षात घेऊन,त्यांनी समाजहिताचे व सामाजिक अनेक कार्य केलेले आहेत. ते सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. पत्रकाराच्या लेखणीमधून त्यांनी समाज कार्य केले आहे. अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.यांच्या कार्याची दखल घेऊन, लिंगायत महासंघ महाराष्ट्राच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार त्यांना नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात झाला.
यावेळी उदगीर येथे वीरशौव लींगायात वधू वर परिचय मेळावा घेण्यात आला. या वधू-वर मेळाव्यास महाराष्ट्र, कर्नाटक, आंद्रप्रदेश,तेलंगणा राज्यातून अनेक भावी वधू आणि वर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम उदगीर शहरातील रघुकुल मंगल कार्यालय, येथे संपन्न झाला आहे.
पुरस्कार सोहळा व वधू-वर मेळाव्यास ष.भ्र.प.1008 डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज,औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, लातुरचे खासदार सुधाकर श्रंगारे,शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, औरंगाबाद महापालिकेचे नगरसेवक विरभद्र गादगे,माजी आमदार गोविंदराव केंद्रे,माजी आमदार मनोहरराव पटवारी, देवणी तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, बसवराज करेप्पा,अनिल शेटकार,शंकरराव पाटील, इत्यादी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे लिंगायत महासंघाचे अध्यक्ष सुदर्शन बिरादार यांनी सत्कार केला.

या प्रसंगी प्रमुख अतिथी माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी समाज कार्य करणाऱ्या पत्रकाराचा सन्मान केल्याबद्दल अभिनंदन केले.सुनील हवा यांना भावी वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच शंभुलिंग शिवाचार्य यांनी अशिर्वचनात शुभेच्या दिल्या.

About The Author

error: Content is protected !!