दसरा महोत्सव श्रध्देने आणि उत्साहात साजरा करा – संजय बनसोडे
उदगीर (एल पी.उगीले) : उदगीर येथील सामुदायिक दसरा महोत्सव समितीची बैठक माजी राज्यमंत्री, आ. संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. तर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकरअप्पा मठाचे प्रमूख सुखदेव स्वामी होते.
उदगीर येथील सामुदायिक दसरा महोत्सवाची बैठक शंकरअप्पा मठा मध्ये या महोत्सव समितीचे अध्यक्ष सुखदेव स्वामी यांच्या अधक्ष्यते खाली तर माजी राज्यमंत्री तथा उदगीर येथील आमदार संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,या बैठकीत मागील दोन वर्षांपासून दसरा कोरोना मुळे शासनाच्या वतीने दिलेल्या आदेशानुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता,या वर्षीचा दसरा महोत्सव हा उत्साहात आणि श्रद्धा पूर्वक साजरा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या वेळेस माजी राज्यमंत्री, आ. संजय बनसोडे यांनी दसऱ्या निमित्त दसरा मैदानात सर्व सुविधा नगरपालिकेने कराव्यात. अश्या सूचना मुख्याधिकारी याना दिल्या. या वर्षीचा दसरा महोत्सव हा मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे महोत्सव समितीने जाहीर केले. या बैठकीस अधक्ष सुखदेव स्वामी, कार्याधक्ष उद्धव महाराज हैंबतपुरे,सचिव ओमप्रकाश गर्जे, उपाधक्ष चंद्रकांत वैजापूरे,सहसचिव पांडुरंग आपटे, कोश्याध्यक्ष अविनाश रायचुरकर, प्रसिध्दी प्रमुख मोतीलाल डोईजोडे ,नामदेव आपटे,संतोष कुलकर्णी, श्रीकांत बडीहवेली, कृष्णकांत बेद्रे,मनोहर पाटील, माधव उगीले, राजकुमार तांदळे, आनंद साबणे,श्रीनिवास सोनी,कैलाश पाटिल, माणिक खडके,अनुप मोरे आदी उपस्थित होते, बैठकीत सर्व पालखी धारकानी सायंकाळी 6 च्या अगोदर दसरा मैदानात यावे. व सर्वाँना सहकार्य करावे, असे आवाहन समिती चे अधक्ष श्री सुखदेव स्वामी यांनी केले आहे.
गुलाब पटवारी यांची अनुपस्थिती खटकणारी
गेले कित्येक वर्षापासून दसरा महोत्सव समिती आणि ज्येष्ठ विधीज्ञ गुलाबराव उर्फ बापूराव पटवारी यांचे संबंध घनिष्ठ होते. इतकेच नाही तर एकूण दसरा महोत्सव समिती आणि विधीज्ञ गुलाब पटवारी यांचे एक समीकरणच तयार झाले होते. मात्र दरम्यानच्या काळात राजकीय समीकरणे बदलली, गुलाब पटवारी हे आपले जुने ऋणानुबंध विचारात घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्याचा परिणाम म्हणून की काय? यावेळी उदगीर येथील दसरा महोत्सव समितीच्या बैठकीसाठी देखील त्यांना वगळण्यात आले असावे, अशी चर्चा जनमानसात सुरू आहे.
