स्वातंत्र्य सैनिक केशवराव नेत्रगावकर यांनी जीवन भर समाजकार्य केले – सुरेश पाटील नेत्रगावकर

स्वातंत्र्य सैनिक केशवराव नेत्रगावकर यांनी जीवन भर समाजकार्य केले - सुरेश पाटील नेत्रगावकर

उदगीर (एल.पी.उगीले) – मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता, प्राणाची आहुती देणार्‍या स्वतंत्र सेनानी यांचे जिवन चरित्र दिवाळी अंकाच्या माध्यमातून प्रकाशित केलेली व भावी पिढीला चालना देणारी साहित्यकृती म्हणजे नवनिर्माणचा दिवाळी अंक होय. असे प्रतिपादन सुरेश पाटील नेत्रगावकर, जेष्ठ पत्रकार उदगीर यांनी केले.

चला कवितेच्या बनात या साहित्यीक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी अंतर्गत गोरख दिवे पोलिस निरीक्षक उदगीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 273 व्या वाचक संवाद मध्ये सुरेश पाटील नेत्रगावकर उदगीर यांनी नवनिर्माण या मराठवाडा स्वातंत्र संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक केशवराव नेत्रगावकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्‍या नवनिर्माण च्या दिवाळी विशेषांकावर संवाद साधताना पुढे म्हणाले की, हैदराबाद मुक्ती संग्राम हा रजाकराच्या अत्याचाराच्या जोखडातून मुक्तीसाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यापैकीच एक म्हणजे केशवराव पाटील होते.

यावेळी नीट परीक्षेत यशस्वी झालेले नेहा विलास मांजरमकर, सृष्टी नामदेव राठोड, शरयू महादेव राठोड, आदित्य भास्कर मोरे सीईटी आणि विजय तानाजी पाटील, सीईटी मधील यशसंपादना बद्दल सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय समारोप करताना गोरख दिवे यांनी महिलांनी घ्यावयाची काळजी, यावर सखोल असे मार्गदर्शन करतानाच सुरेश पाटील यांनी केलेले भाष्य चिंतनशील,नवी दृष्टी देणारे असून वाचक संवाद हा उपक्रम देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. या कार्यक्रमाचे संचलन प्रा.राजपाल पाटील यांनी केले, तर आभार कु.राजनंदिनी मिटू पाटील हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम, आनंद बिरादार, राजेंद्र एकंबेकर, बालाजी सुवर्णकार, हनुमंत म्हेत्रे, सुरेश वजनम, मिटू पाटील, मुरलीधर जाधव आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!