प्रहार च्या उदगीर शहर कार्याध्यक्ष पदी प्रेम तोगरे यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे , महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रमोद भाऊ कुदळे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले , यांच्या आदेशानुसार व जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाऊ तेलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे माजी शहर अध्यक्ष प्रेम तोगरे यांनी बच्चूभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रहार मध्ये पक्ष प्रवेश केला.
प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या शहर कार्याध्यक्ष पदी सर्व शहर कार्यकारिणीच्या उपस्थितीथ एकमताने प्रेमकुमार तोगरे यांची उदगीर शहर कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.निवडीचे पत्र उदगीर-जळकोट मुख्य संघटक -बंडेप्पा पडसलगे ,तालुकाध्यक्ष – रविकिरण बेळकुंदे , तालुका कार्याध्यक्ष – महादेव आपटे, तालुका उपाध्यक्ष-महादेव मोतीपोवळे,तालुका उपाध्यक्ष- संदीप पवार ,तालुका सचिव- अविनाश शिंदे , शहर संपर्क प्रमुख – चंद्रकांत भोसगे , तालुका संघटक – सोपान राजे,शहर सचिव – बालाजी बिरादार ,अभय कुलकर्णी – ता.प्रसिद्धी प्रमुख ,शहर चिटणीस -प्रशांत आडे ,तालुका सह-कोषाध्यक्ष -लखन कांबळे ,बळीराम चौधरी प्रहार सेवक उपस्थित होते .
