शिंदे गटाकडून देखील शिवसैनिकाकडून शपथ पत्र घेणे सुरू !
उदगीर (एल.पी.उगीले) : आपणच खरे शिवसैनिक असून हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा जपणारे सैनिक आहोत. त्या विचारांशी आपली बांधिलकी आहे. अशा पद्धतीची शपथपत्रे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून घेण्याचे कार्य लातूर जिल्ह्यात सुरू झाले आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ तथा जुने शिवसैनिक शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख गुलाबराव उर्फ बापूराव पटवारी यांच्यासह उदगीर तालुका शिवसेना संघटक विकास जाधव, नितीन मोरतळे इत्यादींनी आपण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी घेतलेली भूमिका योग्य असून त्या भूमिकेसोबतच आपण आहोत. अशा पद्धतीचे पत्र दिले आहेत. लातूर जिल्ह्यात देखील आता शिवसेनेमध्ये बऱ्यापैकी खिंडार पडले असून शिंदे गटाचे ही वर्चस्व हळूहळू निर्माण होऊ लागली आहे.
येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निश्चितपणे आपल्याला यश मिळेल, आणि आपणच खरे शिवसैनिक आहोत. हिंदुत्ववादी ध्येय धोरण आपणच जपतो.हे जनताच मत पेठीतून दाखवेल याचा विश्वास ज्येष्ठ विधीज्ञ गुलाबराव पटवारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
