लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाची आढावा बैठक संपन्न

लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाची आढावा बैठक संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील,माजी राज्यमंत्री आ.संजय बनसोडे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.जानबा मस्के, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे यांच्या आदेशानुसार उदगीर येथे शासकीय विश्रामगृह मलकापूर येथे बैठक संपन्न झाली.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवादलाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष नवनाथ गायकवाड हे होते.नवनाथ गायकवाड यांनी उपस्थित लातूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष आणि सेवादलाचे पदाधिकारी यांना सेवादलाचे पक्षातील स्थान व महत्त्व पटवून सांगत आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाचा विचार ग्रामीण भागात, घरा-घरात पोहचवण्यासाठी पदाधिकारी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सेवादलाच्या उपस्थित पदाधिकार्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. या.बैठकीचे आयोजन सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी केले होते.बैठकीचे सुत्रसंचलन शरद शिंदे तर आभार जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी मानले. बैठकीला लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून सेवादलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!