शिवाजी महाविद्यालय व नगर परिषदेच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण

शिवाजी महाविद्यालय व नगर परिषदेच्या वतीने स्मशानभूमीत वृक्षारोपण

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नगर परिषद, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने रासेयो सेवा सप्ताहाच्या निमित्ताने वृक्ष दान-दत्तक अभियानांतर्गत सार्वजनिक स्मशानभूमी व परिसरामध्ये 40 वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये वड, महागणी, नांदूरकी, सिल्वर इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. सार्वजनिक स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात लोक अंत्यविधीसाठी येत असतात. त्यांना उन्हाळ्यात येथे सावली मिळत नाही. याचा विचार करून हे वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाच्या रासेयो विभाग व नगर परिषद, उदगीर यांच्यात प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव व मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवा कार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत हा पहिला कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष नामदेवरावजी चामले मामा, महाविद्यालयाचे प्राचार्य विनायकराव जाधव, रासेयो सल्लागार समितीचे सदस्य व उद्योजक रमेश अण्णा आंबरखाने, ग्रीन बामणीचे राजकुमार बिराजदार, विशाल पाटील शिरोळकर, धनराज बनसोडे, नगर परिषद उदगीर चे पर्यवेक्षक विजेंद्र उळागइडे, इंजिनियर तोंडारे, सामाजिक विभागाचे गेडाम, स्वच्छता विभाग प्रमुख ज्ञानेश्वर काळे व कर्मचारी,उपप्राचार्य आर. एम. मांजरे, ग्रंथपाल व्ही. एम. पवार, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. सुरेश शिंदे, प्रा. अनंत टेकाळे व प्रा. बालाजी सूर्यवंशी तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author