माय माऊलींच्या पाणी टंचाईचा भार कमी व्हावा म्हणून पाणीपुरवठ्याची योजना आणली – आ. संजय बनसोडे

माय माऊलींच्या पाणी टंचाईचा भार कमी व्हावा म्हणून पाणीपुरवठ्याची योजना आणली - आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : आजही ग्रामीण भागातील माझी माय माऊली विहीरवर, हातपंपावर जावून डोक्यावर घागर घेवुन लांबून पाणी आणत होत्या, याचीच जाणीव ठेवुन मी पाणीपुरवठा मंत्री असताना प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी द्यायचे, म्हणून आपण ‘जलजीवन मिशन’ आणली. त्याअंतर्गंत सोमनाथपुर येथे १५ कोटी रुपयाची पाणीपुरवठ्याची योजना मंजूर केली. त्या योजनेचे उद्धाटनही झाले. लवकरच आपली पाणी टंचाई दुर होणार असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरालगत असलेल्या मौजे सोमनाथपुर येथे नवरात्र महोत्सवनिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी येथील दुर्गा देवी मंदिरात आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, सोमनाथपुरचे सरपंच राम सुर्यवंशी, कुणाल बागबंदे, रतिकांत घोगरे, मानसिंग पवार, काशिनाथ स्वामी, पप्पु डांगे, किशोर राठोड, शुभम पाटील, प्रल्हाद राठोड, बबलु पठाण, सुभाष पवार, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी सांगितले माझ्या मतदार संघातील तरूणांच्या हाताला काम मिळावे, म्हणून एमआयडीसी मंजूर केली. त्याचेही काम लवकरच पुर्ण होवून आपल्या तालुक्यात उद्योग येतील व भविष्य काळात येथील बेरोजगारी दुर होईल. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर आपला बौध्दीक विकास व्हावा म्हणून भविष्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन आपण करणार असल्याचेही सांगितले.
कुठलाही लोकप्रतिनिधी हा लोकांचे सेवक असतो, मालक नसतो. त्यामुळे प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे.
लोकप्रतिनिधीचे काम हे आपल्या भागाचा विकास करण्याचे असते. म्हणून मी जनतेचा सेवक म्हणून आपल्या मतदार संघात कोट्यावधी रूपयाचे कामे मंजूर करुन आणली आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उदगीर तालुक्यातील सोमनाथपुर ह्या गावची ओळख जगात गेली. उदगीर शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होत आहेत. आपल्या सर्वांच्या सोईसाठी प्रशासकीय इमारतीचे बांधकाम चालु असुन लवकरच ते आपल्या सेवेत येतील, असे सांगून विकासकामासाठी मी सदैव आपल्या सोबत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथपुरचे सरपंच राम सुर्यवंशी यांनी तर सुत्रसंचालन रतिकांत घोगरे यांनी केले. यावेळी सोमनाथपुर गावातील ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

About The Author