नाबार्ड अंतर्गतच्या अफार्मपुणे नेतृत्वाखाली बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी लोहाराची दुसरी वार्षीकसभा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : भारत सरकारच्या दहाहजार FPO या उपक्रमाअंतर्गत नाबार्डच्या अफार्म संस्था पुणे यांचे नेतृत्वाखाली उदगीर तालुक्यातील बेनिनाथ शेतकरी उत्पादक कंपनी या संस्थेची दुसरी वार्षीक सभा संचालक व मान्यवर इतर नागरिकांचे उपस्थितीत संपन्न झाली.
या सभेसाठी लातूर जिल्हा नाबार्डचे प्रबंधक प्रमोद पाटील, रामेश्वर कलवले, यशवंत गायकवाड, कृषी सहाय्यक हणमंत म्हेत्रे, नितीन दुरुगकर, संदिप अंधारे, दिनेश शिंदे, हंसराज मोमले,व संचालक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी वरिल सर्व मान्यवरांचे स्वागत कंपनीचे अध्यक्ष हंसराज मोमले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी हंसराज मोमले यांनी शेतकर्यासाठीच्या या कंपनी संदर्भातील सखोल माहिती दिली. तर कंपनीचे मुख्याधिकारी शिंदे यांनी वार्षिक सभेचा इतिवृत वाचुन दाखवला, व म्हेत्रे यांनी शेतकरी सभासदांना सखोल मार्गदर्शन केले. प्रक्रिया उद्योग संदर्भातही शेतकर्यांना माहीती दिली.
यावेळी कलवले यांचेही मार्गदर्शन झाले. शेतकर्यांचे मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी चाळणीयंत्राचा वापर करावा, यासाठी कंपनीने पुढाकार घ्यावा. अशीही सुचना केली. व शेतकर्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे अवाहन केले. या सभेला संचालक रामचंद्र सावंत, पदमाकर मोगले, लहु नरहरे, सौ.सिमा साखरे, अनूसया मोमले, गणेश कारभारी, आकाश शिंदे, रुषीकेश मोमले आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार हंसराज मोमले यांनी मानले.