एम आय एम आणि समविचारी पक्षांच्या वतीने गांधी जयंती साजरी
उदगीर (एल. पी. उगिले) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती एम आय एम, राष्ट्रीय दलित अधिकार मंच, अखिल भारतीय दलित पॅंथर, भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमानाने उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरपरिषदेचे माजी नियोजन व विकास सभापती निवृत्तीराव सांगवे, राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुस्मिता माने, एम आय एम चे शहराध्यक्ष शेख अखिल मिया, तालुकाध्यक्ष मुक्रम जागीरदार, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रसिद्धीप्रमुख बंटी घोरपडे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष एस. डी. कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक भीमसेन कांबळे, एमआयएमचे शहर उपाध्यक्ष जलील चौधरी, माजी नगरसेवक साबेर पटेल, एजाज जागीरदार, राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे शहर कार्याध्यक्ष रवी जवळे, एमआयएमचे शहर कार्याध्यक्ष मुसा पठाण, एमआयएमचे शहर सचिव महबूब मुल्ला, वसीम सोफी मदारी , शेख सोहेल, याकुब शेख , इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे यांनी स्पष्ट केले की, आजच्या पिढीला सामाजिक जाणीव जपण्यासाठी महात्मा गांधीच्या विचारांची नितांत गरज आहे. सर्वधर्मसमभाव यासोबतच समाजातील शोषित, उपेक्षित, दलित, गोरगरीब यांच्या हिताचा आणि त्यांच्या अधिकाराचा विचार महात्मा गांधी यांनी मांडला. तो विचार प्रत्यक्षात उतरवणे आज अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे, असेही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन बंटी घोरपडे यांनी केले.