प्रभुराज प्रतिष्ठाण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,लातूरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

प्रभुराज प्रतिष्ठाण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,लातूरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

लातूर (प्रतिनिधी) : प्रभुराज प्रतिष्ठाण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,लातूरच्या वतीने संभाजी नगर,खाडगाव रोड परिसरात राष्ट्रपीता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच महात्मा गांधी यांनी अहिंसा व सत्याच्या मार्गाने प्रेरणा दिली तसेच शास्त्री यांनी जय जवान जय किसान या नाऱ्याने देशवासीयांना प्रेरित केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण च्या वतीने उपस्थित तरुणांना कायदे विषयक माहिती देऊन जनतेने जास्तीत जास्त मोफत कायदे विषयक सल्ला व फायदा करून घ्यावे जेणे करून कार्यालयीन योजना पासून कोणीही वंचित राहू नये “न्याय सबके लिये” यामुळे कोणालाही कायदेशीर अडचण असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,जिल्हा न्यायालयलातूर येथे संपर्क साधावा असे आव्हान जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा न्यायाधीश एस. डी. अवसेकर यांनी केले.उपस्थितांना कायदेविषयक माहितीचे पत्रक वाटून जनजागृती करण्यात आले. जयंती निमित्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अँड.अजय कलशेट्टी,अँड.अशोक जोंधळे,, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दादगिने,सामाजिक कार्यकर्ते संजय जमदाडे,जेष्ठ नागरिक लक्षीमान लोहारेसर,प्रकाश नीला, डॉ. काशीनाथ सलगर,राजेश्वर हारनाळे,मुन्ना भुजबळ,बाळू चोपडे,गणेश होकळे,हणमंत देशमाने,सचिन भोसले,गोपाळ कतलाकुटे,देवा राठोड,गोपाळ खंडागळे,अमोल पवार,लक्ष्मीन पाटील,मुकेश चव्हाण,पठाण मस्तान,नदीम पठाण,नितीन कराड,परमेश्वर केंद्रे,अक्षय जाधव,राम मोरे,दत्ता मुंडे,गोपाळ बाहेती,अंकुश शिंदे,आदित्य चव्हाण,हणमंत नरवटे,आदित्य शिंदे,मोहन पालमपल्ले,विकास ढमाले,प्रेमकुमार देवडीकर, आदी मोठ्या संख्येने तरुण मित्र उपस्थित होते.

About The Author