महात्मा फुले महाविद्यालयास जलतरण स्पर्धेत दोन रौप्य पदक
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत घेण्यात आलेल्या सेंटर झोन च्या जलतरण स्पर्धेत दोन रौप्य पदक प्राप्त झाले असून द्वितीय जनरल चॅम्पियनशिप मिळवत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रातील आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
याबाबतची सविस्तर वृत असे की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उत्कर्ष व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज सगरोळी येथे झालेल्या सेंट्रल झोनच्या जलतरण स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. शीतल सुभाषराव लांडगे हिने ५० मीटर फ्रीस्टाइल व १०० मीटर फ्रीस्टाइल मध्ये सर्व द्वितीय क्रमांक मिळवून रोप्य पदक प्राप्त केले. या खेळाडूला क्रीडा संचालक प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकाचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव कोषाध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य , महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.