बालाघाट तंत्रनिकेतन व आय टी आय मध्ये नूतन विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट तंत्रनिकेतन व आय टी आय मध्ये सन 2022-23 या वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा समीक्षक प्रदीप नंणदकर, संचालक अमरदीप हाके, संचालक कुलदीप हाके, व्यासपीठावर प्राध्यापक शेख अहमद संगीतकार, प्राचार्य स्वप्निल नागरगोजे, प्राचार्य मदन आरदवाड याची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना भारत सरकारने मेक इन इंडिया, मेड इन इंडिया सुरू केला आहे त्यामुळे तंत्र शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे आपण व्यावसायिक शिक्षण घेऊन गुणवत्तापूर्वक उत्तीर्ण व्हावे अशा शुभेच्छा श्री हाके यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. व्यासपीठावरून प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार प्रदीप ननंदकर बोलतेवेळी सर्व विद्यार्थ्यांनी निवडलेला मार्ग आपल्या जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी योग्य त्या मार्गाने धडपड करावी व स्वतःचा व्यवसाय निर्माण करून आपल्या कार्याचा ठसा निर्माण करावा असे मत यावेळी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संचालक अमरदीप हाके, हनुमंत देवकते भाजपा तालुका अध्यक्ष अहमदपूर प्राचार्य स्वप्निल नागरगोजे, प्राचार्य मदन आरदवाड यांची उपस्थिती होती. यावेळी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कला यावेळी सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य स्वप्निल नागरगोजे यांनी केले तर आभार प्राध्यापक संतोष लातुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष लातूरे, कालिदास पिटाळे, समीर कुरेशी, संग्राम कोपनर, गणेश यमगीर, निळकंठ नंदागवळे, शेख तोहीद, रूपा पाटील,अपेक्षा सोनवणे, महेश सूर्यवंशी, गीते, कचवे, सय्यद असिफ, भिसे अभिमन्यू , जोहरे, शेळके अशोक, चोबळीकर, लोहकरे, शरण हंद्राले, मंगेश चव्हाण, बालाजी लवटे ,श्रीराम कागणे, बालाजी देवकते, विजय कुलकर्णी, सिद्राम मासुळे, विजय पांचाळ ,सतीश केंद्रे आदींनी परिश्रम घेतले.