अहमदपूर ते राणीसावरगाव पाणी दिंडीचे काळेगाव मध्ये जंगी स्वागत

अहमदपूर ते राणीसावरगाव पाणी दिंडीचे काळेगाव मध्ये जंगी स्वागत

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील श्री संत चुडामणी महाराज संस्थानची पाणी दिंडी राणीसावरगाव येथे जात असताना मौजे काळेगाव येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सपत्नीक पालखीचे पूजन करून पालखी सह सर्व भक्तांचे स्वागत केले. अहमदपूर येथील जाज्वल्य असलेल्या संत चुडामणी संस्थांनची गेल्या पंचवीस वर्षांपासून नवरात्र उत्सवात राणीसावरगाव येथील दिवीकडे पाई दिंडी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात अहमदपूर ते राणीसावरगाव पायी दिंडी निघाली होती. काळेगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पूजा करून पालखीचे माजी मंत्री विनायकराव पाटील व सौ.सुनिताताई पाटील यांनी सहकुटुंब दर्शन घेतले व सर्व पायी दिंडीत जाणा-या भक्तांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव काका केंद्रे, जुगलकिशोर शर्मा,शरद जोशी, नितीन धर्माधिकारी ,शिवराज पाटील, कमलाकर पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, राहुल शिवपुजे, अँड.निखील कासनाळे, अँड.किशोर कोरे, राजकुमार खंदाडे, सुरेन्द्र पाटील, नागनाथ बिराजदार, डॉ.सुधाकर मुरुडकर, सुनील फुलारी, रामराम शिंदे, नरहरी शिंदे, मकरंद जोशी, दयानंद घाटोळ, सत्यजित पाटील, विलास पाटील,पांडुरंग गलाले, प्रकाश फुलारी ,इतिराज केंद्रे, गणेश हालसे, अविनाश पाटील, अनिकेत काशिकर,अमोल पाटील, राजकुमार तेलंगे ,उद्धव भरडे, लक्ष्मण जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने महिला व पुरुष भक्त मंडळी यावेळी उपस्थित होती.

About The Author