गांधी जयंती निमित्त ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी अहमदपूर येथे रक्तदान शिबिर
अहमदपूर (गोविंद काळे) : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी येथे झालेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 75 जणांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन गणेश दादा हाके (प्रदेश सरचिटणीस भाजपा) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दादाराव पौळ (वकील संघ अहमदपूर) व प्रमुख मार्गदर्शक डॉ. सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी हे होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना अकॅडमीचे संचालक उध्दव ईप्पर म्हणाले की अकॅडमी ही गेल्या 11 वर्षापासून मा. मंचक इप्पर, आयपीएस, पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली चालू झाली आहे. तेव्हापासून प्रतेक वर्षी 2 वेळा रक्तदान करते आतापर्यंत 11 वेळा रक्तदान केले आहे त्यात 864 युनिट वेगवेगळया रक्तपेढी ना दीले आहे. आतापर्यंत 2500 विद्यार्थि हे वेवेगेल्या क्षेत्रांमध्ये यशस्वी झाले आहेत विशेष म्हणजे कोणाकडून ओरिजनल डाकूमेंट ठेऊन किंवा जास्तीचे डोनेशन घेतले जात नाही सर्व सामान्यांना परवडेल अशी ही सर्वांची अकॅडमी आहे. व्यवसाय, नोकरी या बरोबरच माणसाने सामाजिक कार्य पण केले पाहिजे. रक्त हे माणसाचे माणसाला लागते कोणत्याही फॅक्टरी मध्ये तयार होत नाहीं. त्यामुळें ज्ञानदीप अकॅडमी ही चांगले सामाजिक कार्य करीत आहे आपण जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन अधक्षिय भाषणात दादाराव पोळ यांनी केलं.
रक्तदान हे महान दान असून प्रत्येकाने केले पाहिजे. ज्ञानदीप अकॅडमी ही सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते. माझे नेहमी अकॅडमी ला सहकार्य असते, अश्या डोंगराळ भागामध्ये यवढ्या मुली सुरक्षित पणे सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. मुलीची अकॅडमी सुरु करताना रेखाताई तरडे (माजी जि. प. सदस्य) यानी खूप सहकार्य केले असे गणेश दादा म्हणाले. ज्ञानदीप अकॅडमी ही गोर गरिबांची अकॅडमी आहे. येथे माणुसकीचे धडे देऊन येथे प्रशिक्षण घेणार विद्यार्थि हा एक उत्तम नागरिक म्हणुन बाहेर पडतो. आणि एवढी चांगली अकॅडमी आमच्या अहमदपूर मध्ये आहे ही आम्हा अहमदपूर करणं यांचा अभिमान आहे असे युवा नेते शिधार्थ कुमार सुर्यवंशी म्हणाले. तर प्रमुख पाहुणे म्हणून अड. वसंतराव फड, डॉक्टर ऋषिकेश पाटील डॉक्टर, मधुसूदन चेरेकर, डॉक्टर बालाजी मुंड, डॉक्टर केशव मुंडे, डॉक्टर अमृत चिवडे, अड. सुहास चाटे जनार्धन भालेराव, कासणाले अण्णा, (सामाजिक कार्यकर्ते) , अंकुश इप्पर, (चेरमन नागझरी) विकास मोरे (सरपंच खंडळी) बालाजी संगमणिरे, लक्ष्मण भैया अलगुले, पत्रकार अजय भालेराव, उदय गुंडीले, बालाजी तोरणे, नरशिंग सांगवीकर व इ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. चिमणराव कावळे यांनी तर आभार नितीन गुट्टे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राम मेजर ,प्रा.राहुल ढवळे प्रा. संदीप मुसळे,प्रा. अमोल वाघमारे .संदीप नरवटे ,महिला प्रशिक्षक शहनाज प्रवीण व अर्चना करपे आदींनी परिश्रम केले.