कोणत्याही योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित ठेवणार नाही ! – तहसीलदार रामेश्वर गोरे

कोणत्याही योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित ठेवणार नाही ! - तहसीलदार रामेश्वर गोरे

उदगीर (एल.पी.उगीले) : मौजे कुमठ खु ता उदगीर येथे राजस्व अभियान व सेवा पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये लाभार्थी यांना शिधापत्रिका वाटप विविध प्रकारचे दाखले वितरण तसेच शेतकरी यांना सातबारा व त्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन विकास कार्यकारी सेवा सोसायटी कुमठा तालुका उदगीर यांच्यावतीने करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव केंद्रे हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार रामेश्वर गोरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार राजेश बेंबळगे, विभागाचे मंडळ अधिकारी पंडित जाधव, कुमठा गावाचे तलाठी राजकुमार हलकुडे, लातूर जिल्हा माजी सैनिकाचे अध्यक्ष नामदेवराव जाधव काका, माजी सरपंच विश्वनाथ केंद्रे, माजी विस्तार शिक्षण अधिकारी दिनकर केंद्रे, माजी सरपंच राजकुमार पवार, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक तानाजी जाधव तसेच सर्व संचालक उपस्थित होते. तसेच गावातील शेतकरी शिवाजी नामदेव केंद्रे, काशिनाथ केंद्रे, शिवाजी व्यंकटराव केंद्रे, बालाजी केंद्रे, बाळराजे पवार,प्रवीण केंद्रे हे उपस्थित होते. यावेळी दिनकर केंद्रे व पंडित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात बोलताना तशिलदार रामेश्वर गोरे यांनी शासनाच्या विविध योजनेपासून कुमठा गावातील पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी हमी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी फड यांनी केले तर आभार तलाठी राजकुमार हालकुडे यांनी मानले.

About The Author