अंकिता भंडारी यांना युवक काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
उदगीर (एल.पी.उगीले) : अंकिता भंडारी या युवतीस उत्तराखंड येथील भाजपा मंत्र्याच्या मुलाने पाण्यात ढकलून देऊन ठार मारुन हत्या केली.या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.विजय राजेश्वरजी निटूरे,शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मंजूरखां पठाण,माजी उपनगराध्यक्ष फैजूखा पठाण,उदगीर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल कांडगीरे,भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संजय काळे, उदगीर विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष अमोल घुमाडे,लातूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्रीनिवास एकुर्केकर,उदगीर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस फैयाज डांगे,मनोज कलबुर्गे,उदगीर विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस,ॲड.यशवंत पाटील,अशिषसिंग ठाकुर,प्रकाश गायकवाड़,रामजी पिंपरे, विपिन जाधव,सचिन बिरगे इत्यादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.