ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, देवर्जन येथे शिबिराचे आयोजन

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, देवर्जन येथे शिबिराचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगिले) : तालुक्यातील मौजे देवर्जन येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन डॉ. किरण गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. शिबिराचे उद्घाटन गावचे सरपंच खटके यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य उषाताई रोडगे होते.
या शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती डॉ.कांडगिरी (त्वचारोग तज्ञ),डॉ.विजय बिराजदार (अस्थिरोग तज्ञ), डॉ.नरवटे ,डॉ.तांबोळी , डॉ. प्रशांत नवटके(मधुमेह तज्ञ) उपस्थित होते. या शिबिरामध्ये एकूण 300 हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. गावामध्ये व आसपासच्या गावांमध्ये शेतातील कामे असून सुद्धा शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. सर्व डॉक्टरांनी या शिबिरामध्ये आपापल्या विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले.
या शिबिरामध्ये एकूण 42 मधुमेही रुग्ण तर 57 रक्तदाबाची रुग्ण आढळून आली. मधुमेहाची व रक्तदाबाची तपासणी नवीन शृंगारे,स्वप्निल फुलारी यांनी केली.

About The Author