राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती श्यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती श्यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती श्‍यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर भारत रत्न लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दोन्ही महापुरुषांचे कार्य स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाला नवी दिशा देणारे होते त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य केले पाहिजे असे मत मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त संस्थाध्यक्ष सुपोषपाणि आर्य सर व संस्था पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
श्रुती देवणे,जाधव अस्मिता, गोंडगावे सिंधू,भांगे गुरुदेव,माने आमित, कमलापुरे खुशी, केंद्रे सुहानी इत्यादी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी प्रभावी भाषेत दोन्ही महापुरुषांच्या कार्याबद्दल भाषणातून माहिती दिली. प्रभावी भाषण केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव हाके यांनी केले तर आभार उमाकांत सूर्यवंशी यांनी केले.

About The Author