भाजपाच्या वतीने हुतात्मा स्मारकात स्वच्छता अभियान: विकास कामाचे उदघाटन
उदगीरात सेवा पंधरवाडा चा समारोप

भाजपाच्या वतीने हुतात्मा स्मारकात स्वच्छता अभियान: विकास कामाचे उदघाटन<br>उदगीरात सेवा पंधरवाडा चा समारोप

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सेवा पंधरवाडाचा 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून समारोप करण्यात आला. हुतात्मा स्मारकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तर शहरात प्रभाग क्रमांक 19 मध्ये विविध विकास कामाचे उदघाटन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला होता. या अभियानात रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, स्थानिक उत्पादन निर्मात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा सत्कार करणे, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर यासह अनेक उपक्रम राबविण्यात आले.
या सेवा पंधरवाडा कार्यक्रमाचा समारोप आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करून व विविध उपक्रम राबवून करण्यात आला.
सकाळी प्रभाग क्रमांक 19 वार्डात हनुमान नगर सिग्नल नंबर दोन, महादेव मंदिर येथे विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. हुतात्मा स्मारक उद्यान येथे स्वच्छता मोहीम व खासदार सुधाकर शृंगरे यांचा वतीने निमंत्रित भाजपा कार्यकर्त्यांना खादीच्या वस्त्रांचे वाटप करून परिसराची स्वच्छता करण्यात आली. सामान्य रुग्णालय उदगीर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या कार्यक्रमाना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अमोल निडवदे, उत्तरा कलबुर्गे, मीनाक्षी पाटील, पंडित सुर्यवंशी, धर्मपाल नादरगे, वसंत शिरशे बालाजी गवारे, साईनाथ चिमेगावे, ऍड. दत्ताजी पाटील, ऍड सावन पस्तापुरे, गणेश गायकवाड, संजय पाटील, जया काबरा, बबिता पांढरे बाई ,मंदाकिनी जीवने,आनंद साबणे, सागर बिरादार, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author