राधासाई दांडीयाने मोलाचा संदेश दिला, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात राजकारण नको – माजी आ.भालेराव
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर शहराची परंपरा बनलेल्या राधास्वामी दांडिया महोत्सवाने यावर्षी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये राजकारणी लोकांनी राजकीय जोडे बाहेर ठेवावेत, असा संदेश देत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना घेऊन बाळासाहेब पाटोदे, अभिजीत औटे, सतीश पाटील आणि त्यांच्या मित्रमंडळाने अभिनव अशा पद्धतीचा भव्य दिव्य राधास्वामी दांडिया महोत्सव आयोजित केल्याबद्दल माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी संयोजकाचे अभिनंदन केले.
यावर्षी शहराच्या मध्यवस्तीत शासकीय दूध योजना येथे या राधासाई दांडीया महोत्सवाचे आयोजन करून शहरातील एकच मोठा दांडिया महोत्सव आयोजित करून सर्वांना एकत्र करून धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कृती जपण्यासाठी राजकीय विचारधारा बाजूला ठेवून कार्यक्रमाचे आयोजन केले जावे, असा संदेशच जणू या महोत्सवाने दिला आहे. असेही गौरवोद्गार माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी काढले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पूदाले, महिला आघाडीचे नेत्या उत्तरा कलबुर्गे, माजी नगर सेवक विधीज्ञ दत्ता पाटील, संयोजन समितीचे बाळासाहेब पाटोदे, अभिजीत औटे, सतीश पाटील मानकीकर यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.