सक्षम समाजनिर्मितीसाठी अहवानात्मक अभ्यासक्रम निर्मितीची आवश्यकता – प्रा.डॉ. नारायण कांबळे

सक्षम समाजनिर्मितीसाठी अहवानात्मक अभ्यासक्रम निर्मितीची आवश्यकता - प्रा.डॉ. नारायण कांबळे

अहमदपूर (गोविंद काळे) : समकालीन समाजातील प्रश्न, समस्या याचा अभ्यास करून सोबतच नविन अहवानाचा अभ्यासात समाविष्ट करणे आवश्यक आहे. तरच समाजात नव्याने परिवर्तन घडवून आणले जाईल असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत तथा समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.नारायण कांबळे यांनी केले. विद्यापीठाच्या समाजशास्त्र विषयात अंधश्रध्दा निर्मूलनाचा विषय अभ्यास क्रमात समाविष्ट केल्या बद्दल

येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण कांबळे यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला होता या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ. भूषणकुमार जोरगुलवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. गोविंदराव शेळका,मोहसिन बायजीद,प्रकाश गादगिने,अशोक चापटे,प्रा.द.मा.माने, डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी पूढे बोलताना प्रा.डाॅ.नारायण कांबळे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी केलेला त्याग कधीही न विसरणार असून तो कायम तेवत ठेवण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून बीए च्या विद्यार्थ्यांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विवेकी चळवळीचा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करून परंपरेला छेद देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नवनिर्माण समाज निर्मिती झाली पाहिजे .  चळवळीचा विषय प्रत्येक वर्षी चार हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात रुजवला जाणार आहे.

या प्रसंगी जस्ट विचारवंत डॉ.भूषणकुमार जोरगुलवार अध्यक्ष समारोप करताना अंधश्रद्धा म्हणजे स्वतःची बुद्धी घाण ठेवणे व येणाऱ्या काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा तळागाळापर्यंत रुजवणे गरजेचे असून ग्रामीण भागात व महाविद्यालयातील विद्यार्थी व तरुण पिढीच्या खांद्यावर मोठी ही जबाबदारी आहे. आणि शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांचे काम एका शतकामध्ये होणे शक्य नाही . प्रत्येक चमत्कारा मागे विज्ञान आहे .जादू नाही हे  याच्या तळाशी जाणे गरजेचे आहे. आठवड्यातून एकदा उपास करणे घरासमोर तुळशी वृंदावन असणे याच्या पाठीमागे विज्ञान जोडलेले आहे .याची माहिती अजूनही नाही .  अंधश्रद्धा दूर करणे हे तुमची माझी मोठी जबाबदारी आहे असे यावेळी आपले भावना व्यक्त केल्या.प्रा गोविंद शेळके,प्रकाश गादगीने, रामभाऊ तत्तापुरे, प्राअशोक चापटे,डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.रत्नाकर नळेगावकर  तर सूत्रसंचालन मेघराज गायकवाड यांनी केले. या वेळी अंनिसचे अध्यक्ष डॉ.धीरज देशमुख,मोहिब खादरी, चंद्रशेखर भालेराव, इमरोज पटवेकर,प्रा. अतुल पागे,भागवत येणगे,शेषराव ससाणे, सुजित गायकवाड,नाना साहेब कदम, अशोक मिरदोडकर. धर्मपाल सरवदे,विरेंद्र पवार,मिलिंद गोदाम आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे अभार पत्रकार सुरेश डबीर यांनी मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!