दुर्गा माता नवरात्र महोत्सवात विवेक अंकाचे वितरण

दुर्गा माता नवरात्र महोत्सवात विवेक अंकाचे वितरण

अहमदपुर (गोविंद काळे) : अहमदपुर शहरातील फुले नगर येथील दुर्गा माता नवरात्र महोत्सवात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आरतीचे आयोजन करुन साप्ताहिक विवेकचा हिंदुत्व ग्रंथाची नोंदणी शुल्क भरून सभासदांच्या हस्ते दुर्गा देवीची आरती करण्यात आली. सदरील महोत्सवात विवेक अंकाचे वितरण भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नवरात्र महोत्सव समिती अध्यक्ष, गोविंद हिवरे, उपाध्यक्ष सुशांत गुणाले व सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते अदीशक्ती दुर्गा देवीची आरती करून त्यांच्या हस्ते सर्व विवेक सप्ताहीक सभासद बांधवाचा विवेक अंक देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी विवेक हे समाजजागृती ,देशप्रेम विचारप्रबोधन करणारे साप्ताहीक आहे त्यासाठी सर्वानी सहकार्य केले पाहीजे असे आवाहन माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी यानी केले. सदरील कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर सर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, भाजपा नेते ज्ञानोबा बड़गिरे, चंद्रशेखर डांगे, नगर सेवक राहुल शिवपूजे, इंजिनिअर अनिलजी फुलारी, प्रा. सुनील मजगे, बबन आरदवाड, कुमार चव्हान, संतोष मद्देवाड, काशीनाथ भालके, अश्विन आंधळे, मुन्ना अय्या, गणेश बेंबळकर, शिवानंद भोसले, माधव शेटकार, राम अलगुले, गणेश हालसे, अँड किशोर कोरे, अँड.निखिल कासनाळे, गंगाधर हेंगने, आशीष हेंगने, सतीश मद्देवाड, गुणाजी भगत, कृष्णा कोटगिरे, यतिन पटेल, सुरेश जगताप, सुनील हालसे , प्रज्वल बुलबुले, दीपक हालसे यांच्या सह दुर्गा माता नवरात्र महोत्सवाचे पदाधिकारी व फुले नगर मधील भावनीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थिति होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!