विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी
शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार सुरवसे यांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी
लातूर (प्रतिनिधी) : महाडीबीटी प्रणाली द्वारे वितरित केली जाणारी पोस्टमेट्रिक शिष्यवृत्ती खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत मिळणारी शिष्यवृत्ती दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना मिळालेली नसून विद्यार्थ्यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा करून देखील प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे कोरोना सारख्या काळात शिक्षण घेत असताना अनेक अडचणीवर मात करून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर हे आपल्या पाल्याची शैक्षणिक शुल्क भरतात. परंतु शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती सलग दोन वर्षापासून विद्यार्थ्यांना मिळालेली नसून मागील वर्षाची तर अर्जाची छाननी सुद्धा प्रशासनाकडून झालेली नाही. लवकरात लवकर अर्जाची छाननी करून दोन वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती तात्काळ विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशी मागणी शिवसेना लातूर तालुकाप्रमुख राजकुमार सुरवसे यांनी केली. यावेळी उपतालुकाप्रमुख मल्हारी तनपुरे, गौरव जाधव, उरगुंडे प्रतितोष, पौळ नागेश, अजय मोरे, धुमाळ वैभव, नेलवाडे विष्णु, उपाडे मयुर ऋषिकेश पारसेवार, चामे नीलेश, हुड्डेकर रामकृष्ण आदी विद्यार्थी उपस्थित होते.