शिवसेनेच्या शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन – सचिन दाने

शिवसेनेच्या शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन - सचिन दाने

लातूर (प्रतिनिधी) : ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील व रेणापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळाव्यास शिवतीर्थ मुंबई मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी केले आहे. लातूर वरून दिनांक 4 रोजी संध्याकाळी 10वाजता रेल्वे ची सोय शिवसेना शहर च्या वतीने जिल्हा प्रमुख शिवाजी माने, मा. जी. प्रमुख पप्पुभाई कुलकर्णी व महानगरप्रमुख विष्णुपंत साठे यांच्या वतीने करण्यात आली आहे. व धाराशिव वरून खास दसरा मेळाव्यासाठी तुळजाभवानी एक्स्प्रेस दि 5रोजी पहाटे 1 वाजता रेल्वे ची सोय खा ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास दादा पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी, छत्रपती शिवरायांचा भगवा घेऊंन उत्साहात आणि तेवढ्याच शिस्तीने यावे असे ही सांगण्यात आले आहे.या ऐतिहासिक मेळाव्याला कसल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकांची आहे अने ते निष्ठेने पार पडतील असा ही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.आणि रेणापूर तालुक्या मधून शिवसैनिक जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात उत्साहात दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील असा ही विश्वास व्यक्त करण्यात दाने यांनी व्यक्त केला आहे.

About The Author

error: Content is protected !!