अहमदपूर दसरा महोत्सवात संस्थेचे सोनं लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे

अहमदपूर दसरा महोत्सवात संस्थेचे सोनं लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे

दसरा महोत्सव समितीचे आवाहन

अहमदपूर (गोविंद काळे) : गेले पंचवीस वर्षापासून सर्वधर्मसमभाव, राष्ट्रीय एकात्मता व अखंडता जोपासणारा सार्वजनिक दसरा महोत्सव, नयनरम्य अतिशबाजी व अमृतसम प्रवचनाचा सोहळा दि. ५ रोज बुधवारी सायंकाळी पाच वाजता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होणार आहे या सोहळ्याला शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी व माता भगिनींनी याचा लाभ घ्यावा असे वाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्षापासून घरी बसून दसरा महोत्सव साजरा केला परंतु परमेश्वराच्या आशीर्वादाने यावर्षी सर्वच महोत्सव अत्यंत उत्साहाच्या वातावरणा मध्ये संपन्न होत असताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने या दसरा महोत्सवामध्ये रावण दहन विद्यमान नगराध्यक्षाच्या हाताने करण्याची परंपरा आहे. परंतु प्रशासनाच्या आद्या देशाप्रमाणे नगरपरिषदेची बॉडी बरखास्त करून करून त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे यावर्षीचा सार्वजनिक दसरा महोत्सवातील रावण दहन नगर परिषदेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे उपस्थित राहणार आहेत. यावेळी दसरा महोत्सवाच्या व्यासपीठावर भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी, ह भ प परमपूज्य अनंत महाराज बेलगावकर यांचे अमृतसम प्रवचन, नयनरम्य आतीशबाजी आणि रावण दहनाचा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन दसरा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर, मार्गदर्शक ओम भाऊ पुणे, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष राम पाटील, सचिव सुभाष गुंडिले सह कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.

About The Author