कै. ज्ञानोबा सुरवसे यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त शंकर सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
लातुर (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ येथील कै. ज्ञानोबा सुरवसे यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त शंकर ज्ञानोबा सुरवसे यांनी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथील सर्व विद्यार्थानां शालेय साहीत्य व खाऊ वाटप करण्यात आला. दरवर्षी शंकर सुरवसे हे त्यांच्या वडीलांची पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरी करतात. गेल्या वर्षी वृद्ध आश्रम लातूर येथे पुण्यतिथी साजरी केली होती. आज त्यांनी शालेय साहित्य व खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना केले. यावेळी पं.स.सदस्य भीमाशंकर शेटे, सरपंच ,सौ. अनिताताई मधुकर जोगदंड, उपसरपंच विश्वास कावळे, मा.जि.प.सदस्य काशीनाथ ढगे, शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार सुरवसे, ग्रां. पं.सदस्य गोविंद नांदे, वैजनाथ लवटे, भारत कणसे, महादेव भालेकर, नवनाथ पाटील, चंद्रकांत सुरवसे, गणेश चव्हाण, वामन कांबळे, व्यंकटेश सुरवसे तसेच जि.प.प्राथमिक.शाळेतील मुख्याध्यापक बी.डी.बोयणे, बी.आर. म्हेत्रे, सुर्यवंशी मॅडम, धर्माधिकार मॅडम, गीरी मॅडम, अंगणवाडीतील शोभा अंकुशे मॅडम, रेखा चित्ते मॅडम आदी उपस्थित होते.