समर्थ विद्यालयात विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थीनी मेळावा.

समर्थ विद्यालयात विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थीनी मेळावा.

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी विशाखा समितीच्या वतीने विद्यार्थीनी मेळावा घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. योजना मुखेडकर, पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, प्रा. बी. एस. बाबळसूरे, विशाखा समितीच्या अध्यक्षा वर्षाराणी कवडगावे आदी उपस्थित होते.
यावेळी विशाखा समितीचे कार्य व कर्तव्य या विषयी प्राचार्य प्रमोद चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. योजना मुखेडकर यांनी मुलींच्या वैयक्तिक स्वच्छतेविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थीनी संयोगिता पाटील, दिपाली कांबळे, रिना कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अमर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन बबिता मुंडे हिने तर आभार सरस्वती शेवाळे हिने मानले. कार्यक्रमास शालेय विद्यार्थीनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!