आ.रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते सभागृहाचे गंगापुर येथे उद्घाटन

आ.रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते सभागृहाचे गंगापुर येथे उद्घाटन

लातूर (एल.पी.उगीले) : आमदार निधीतून लातूर तालुक्यातील आदर्श गाव मौजे गंगापूर येथे १२ लाख रुपये खर्चाच्या बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते उद्घाटण करण्यात आले.
गंगापुर येथे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी ग्रामपंचायत गंगापूर कार्यालयास भेट असता सरपंच बाबु हणमंतराव खंदाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. .
या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गंगापुर येथे आ. रमेशअप्पा कराड यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच बाबु हणमंतराव खंदाडे, उपसरपंच रफीक शेख, विविध विशाल सहकारी संस्थां म. गंगापुर चे चेअरमन नारायण आबा शिंदे, माजी चेअरमन हणमंतराव खंदाडे, सोसायटी संचालक सुग्रीव वाघे, तंटामुक्ती अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर शेलार, भाऊसाहेब मिंड, ग्रामविकास अधिकारी रामचंद्र मलीले, सिकंदर शेख, लक्ष्मणराव दंडीमे, व्हाईस चेअरमन जनार्दन अप्पा फुटाणे, सुजित वाघे, शिवाजी दंडीमे, प्रभाकर तळेकर, ज्ञानोबा तळेकर, सचिन खंदाडे, विष्णु चामे, प्रभाकर भाग्यवंत, विनोद दंडीमे, प्रताप शिंदे आदिजण उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!