हावगीस्वामीतील वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्या अध्यक्षपदी सय्यद वजीरबी तर सचिवपदी साक्षी डोंगरे

हावगीस्वामीतील वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्या अध्यक्षपदी सय्यद वजीरबी तर सचिवपदी साक्षी डोंगरे

उदगीर (एल.पी.उगीले) : श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्या अध्यक्षपदी सय्यद वजीरबी तर सचिवपदी साक्षी डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदस्य म्हणून अभिषेक स्वामी, वैष्णवी केंद्रे, संगमेश्वर दावणे,चैतन्य जोशी,संदीप भुजबळे,मनीषा गायकवाड, सविता मलकापुरे, मृदुला कुलकर्णी,स्नेहा ददापुरे, मनीषा कारभारी, भाग्यश्री स्वामी, रोशनी जाधव, इत्यादीचा समावेश आहे. महाविद्यालयातील वक्तृत्व व वादविवाद मंडळाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. मंडळातील या पदाधिकाऱ्यांची निवड शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी करण्यात आली आहे.
मागच्या वर्षी या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले होते. यात पुस्तकावर बोलू काही याबरोबरच शॉर्ट फिल्म कार्यशाळा इत्यादीचा समावेश आहे. मंडळाच्या वतीने युवा कट्टा हा युट्युब चॅनेल काढण्यात आला असून या चैनलवर विद्यार्थ्यांचे छप्पन व्हिडिओ आहेत. गतवर्षी एकूण चाळीस निबंध विविध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय व राज्यपातळीवर पारितोषिक देखील प्राप्त केले. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच वक्ते म्हणून काही विद्यार्थी बाहेर गेलेले आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी स्वतः चैनल काढून व्हिडिओ तयार केलेले आहेत. संभाषणकौशल्य व लेखन कौशल्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने हे मंडळ कार्यरत आहे.
मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.एस.एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, वक्तृत्व व वादविवाद मंडळ समितीतील डॉ.म.ई. तंगावार, प्रा.वसंत पवार, डॉ.दत्ताहरी होनराव, प्रा.धनराज बंडे, प्रा.जे.डी.संपाळे, प्रा.एन.आर.हाके, प्रा.मनोहर भालके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

About The Author