अंधश्रद्धेचे भुत समाजातील अनेकांच्या मनावर आजही कायम आहे – माधव बावगे

अंधश्रद्धेचे भुत समाजातील अनेकांच्या मनावर आजही कायम आहे - माधव बावगे

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजात गाव तिथे शाळा, शाळा तिथे शिक्षण पोहचले. तरी पण अंधश्रद्धा आजही समाजात वावरत आहे.काही समाजात चुकीचे ज्ञान देतात, त्यामुळे अंधश्रद्धेला वाव मिळत असतो.असे माधव बावगे यांनी डि.डी.यू के येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया अध्यक्ष उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर हे होते,तर मंचावर अनिसचे माधव बावगे अनिस कार्यध्यक्ष लातुर, अनिल दरेकर अनिस जिल्हाध्यक्ष लातुर,विश्वनाथ मुडपे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक,प्रा.राजेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचा सत्कार डाॅ.रामप्रसाद लखोटीया अध्यक्ष उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर यांच्या वतिने करण्यात आला.
माधव बागवे पुढे बोलताना म्हणाले की, समाजात आजही डोक्यावर चार– चार, पाच– पाच वर्षांपासून जटा वाढवत आहेत. या जटा वाढण्यामागचे कारण म्हणजे देवाच्या जटा असल्याचे अनेकजण सांगतात.पण विचार करायला हवा, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर कमीत कमी दोन ते तीन किलो ओझ होते.त्यामुळे अशा व्यक्तींला मानेचा त्रास होऊ शकतो.
समाजात अंनिस’ मार्फत अंधश्रद्ध निर्मुलन चे कार्य सुरू आहे.असे ही ते उपस्थित विद्यार्थाना मार्गदर्शन केले. आणि अशी जट असलेल्या महिलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.यावेळी प्रा शिवाजी सावळे,गणेश मुंडे,प्रा.विठ्ठल पवार,प्रा.निकम,प्रा.भालेराव,रेखा माने,रामकिशन भोसले उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सोनकांबळे यांनी केले.

About The Author