संवीधानाच्या मजबूत पायावर भारतीय लोकशाही टिकून आहे – माधव बावगे
उदगीर (एल.पी.उगीले) : आपल्या देशातील लोकशाहीवर देशांतर्गत राजकीय वादळे, धर्मांधता, भाषिक व प्रांतवाद , फुटीरता व दहशत वादामुळे भारतीय लोकशाही प्रणाली डळमळीत होत असल्याचे चित्र परकीय भाष्यकाराना वाटतं होते.भारतीय संविधान हा आपल्या लोकशाही चा दीपस्तंभ आहे. आदर्श संविधानामुळे भारतीय लोकशाही टिकून असल्याचे मत महाराष्ट्र अंनिस चे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे नी व्यक्त केले.
डोंगरशेळकी येथील धोंडूतात्या विद्यालयाचे
मु.अ.व्यंकट बेंबडे यांच्या अध्यक्षतेखाली
आयोजित कार्यक्रमात ‘भारतीय संविधान व
वैज्ञानिक दृष्टिकोन ‘या विषयावर पुढे ते म्हणाले, संविधानाने आपणाला अनेक हक्क दिले, तसेच आपणास कर्तव्याची
जाणिव ही करून दिली.तत्पूर्वी अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकरांनी
ध्वनी व वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात योग गुरू शिवमूर्ती भातांब्रेनी
आरोग्याचा व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपेनी स्त्री शक्तीचा जागर घातला.कार्यक्रमात अनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव घटकार, शाळेतील भावी नवदुर्गा स्वीटी गायकवाड व मीरा पांचाळ यांचाही पाहुण्यांच्या हस्ते सत्कार झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव गोटमुकलेनी,सूत्र संचालन डि.जी सूर्यवंशी यानी तर केंद्र प्रमुख एस.पी.मुंढेनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गंगाधर बोरळे
भानुदास मुंढे, व्यंकट गोमारे, राजपाल खंदाडे वमाधव सूर्यवंशी नी परिश्रम घेतले.