विजयकुमार चवळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले, माजी नगरसेवक तथा विलासराव देशमुख विचार मंचचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, उदगीर मधील युवा चेहरा सामाजिक जाणिवेचे भान आणि जाण असलेले विजयकुमार चवळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय सहभागाची नोंद व्हावी. यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजयभाऊ बनसोडे यांनी विजयकुमार चवळे यांची लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सदरील नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.
सदरील पत्रामध्ये माजी नगरसेवक विजयकुमार चवळे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून आपण राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य कराल, पक्ष बांधणीसाठी मोठे सहकार्य कराल. अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. विजयकुमार चवळे यांच्या या निवडीचे पत्र देताना माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजयभाऊ बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख समीर, श्रीकांत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. विजयकुमार चवळे यांच्या या निवडीबद्दल उदगीर शहरातील मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे निश्चितच मोठे कार्य होईल, असा विश्वासही कार्यकर्त्यांना वाटतो आहे.