बिल्कीस साठी सरसावले बारा हजार उदगीरकर

बिल्कीस साठी सरसावले बारा हजार उदगीरकर

उदगीर (एल.पी.उगीले) : बिल्कीस प्रकरणी माफी दिलेल्या सर्वच्या सर्व अकरा दोषींना गुजरात सरकारने दिलेली माफी तत्काळ रद्द करावी. या मागणीसाठी प्रयासच्या वतीने 12000 सह्यांचे निवेदन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना उपजिल्हा अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन ते गांधी जयंती दरम्यान ठीक ठिकाणी सह्यांचे संकलन करण्यात आले. महामहीम राष्ट्रपती, महामहिम राज्यपाल, पंतप्रधान व सुप्रीम कोर्टाचे याचिका करते यांना सदरील सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन ते गांधी जयंती दरम्यान ठीक ठिकाणी सह्यांचे संकलन करण्यात आले. याप्रसंगी गुजरात सरकारवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. एका बाजूला महिलांसाठी अत्यंत कठोर कायद्यांची गरज व त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याची वेळ असताना अशा पद्धतीने आरोपींना सोडणे संताप जनक असल्याचे नागरिकांची भावना होती.
याप्रकरणी जनतेच्या भावना न्यायालयाने लक्षात घ्यायला हवेत, व त्या सर्व आरोपींना तात्काळ शिक्षा पूर्तीसाठी कोर्टाने आदेश द्यावेत. अशी मागणी प्रयास च्या वतीने करण्यात आली. उदगीर, जळकोट, वाढवणा हळी, अतनूर, घोणसी आदी परिसरातील नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.
प्रयास च्या वतीने या मोहिमेसाठी आशिष राजूरकर, आदिती पाटील, ओमकार गांजुरे, अहमद सरवर, निखिल मोरे, शिवकुमार जाधव, ऍड. नरेश सोनवणे, ऍड. अजय डोणगावकर, श्रीनिवास एकुरकेकर, श्रीकांत शिंदे, कृष्णा माळी, ऍड. नवाज मुंजेवार, अजित शिंदे, सिद्धार्थ सूर्यवंशी, महेश धुळशेट्टे, नितीन सोमुशे, माधव वाघमारे, बाबर पटेल व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

About The Author