दयानंद कला महाविद्यालयात संत रविदास यांची जंयती उत्साहात साजरी

दयानंद कला महाविद्यालयात संत रविदास यांची जंयती उत्साहात साजरी

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयात शनिवारी दि.२७ फेब्रुवारी २०२१ रोजी संत रविदास यांची जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रंसगी संत रविदास यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी संत रविदास यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना असे प्रतिपादन केले की संत रविदास पंधराव्या शतकातील थोर संत, कवी, दर्शन शास्त्री व समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. आपल्या लेखणीतून समाजातील स्पर्श अस्पृश्य, गरीब-श्रीमंत असे भेदभाव दूर करून समाजात एकता निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. संत रविदास यांच्या साहित्यातून समाज सुधारणा करण्याचे कार्य झाले आहे.त्यांचे विचार व कार्य आजच्या समाजाला प्रेरक व मार्गदर्शक ठरू शकतात असे प्रतिपादन केले.

अभिवादन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे , डॉ.शिवाजीराव जवळगेकर, डॉ. रमेश पारवे, डाॅ.अंजली जोशी, डॉ. संतोष पाटील, डॉ.नितीन डोके, डॉ.राजकुमार मोरे, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव, प्रशासकीय कर्मचारी आदी उपस्थित होते.

About The Author