महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत रात्रीच्या वेळी संचार बंदी लागू

महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत रात्रीच्या वेळी संचार बंदी लागू

लातूर (प्रतिनिधी) : जिल्हयात मागील काही दिवसांत कोविड-19 रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे, कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेले बहुतांश निर्बंध हटविण्यात आले असून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका व उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिका हद्दीत आज पासून ते पूढील आदेश येईपर्यंत रात्री 11.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत संचारबंदी (Night Curfew) लागू करीत असल्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशात अत्यावश्यक / जीवनावश्यक सेवा (वैद्यकीय सेवा, मेडिकल्स, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ई.) यांना सूट / सवलत देण्यात आलेली आहे. कोव्हीड-19 प्रतिबंधात्मक व सुरक्षा नियम शारीरीक अंतर, फेसमास्कचा वापर, निर्जतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता ई. सावधगिरीच्या नियमांचा कोटेकारेपणे पालन करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,2005, साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897, अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 तसेच महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे ही आदेशात नमूद केले आहे.

About The Author