विजयकुमार चवळे यांच्यामुळे राष्ट्रवादीला बळ मिळेल – मुंडकर
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीरचे माजी नगरसेवक तथा संघटन कुशल युवा नेते विजयकुमार चवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून अतिशय उत्कृष्ट कार्य केल्याचे तसेच त्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितपणे बळ मिळेल. असे विचार मादलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उदयसिंह मुंडकर यांनी व्यक्त केले.
ते राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान उदगीर च्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. माजी नगरसेवक विजयकुमार चवळे यांच्या मागील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील तसेच माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी विजयकुमार चवळे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तोंडचिरच्या विविध विकास सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, उद्योजक मनोज सुकणे, उत्तम मोरे, संदीप जाधव, संदीप नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुंडकर यांनी स्पष्ट केले की, योग्य माणसाला योग्य संधी मिळाल्यास काम करायला उत्साह येतो. तसेच पक्ष संघटन बांधणीला सुद्धा गती येते, असा विश्वास व्यक्त केला.
