बसव ब्रिगेडच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी प्रा नंदकुमार पटणे गुरधाळकर
उदगीर (एल.पी.उगीले) : बसव ब्रिगेडच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी गुरधाळचे उपसरपंच प्रा नंदकुमार पटणे गुरधाळकर यांची निवड करण्यात आली. ही निवड बेंगळूर येथील जगतगुरू डॉ चनबसव महास्वामिजी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
ही निवड बसव ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष अविनाशजी भोसीकर व किशोर भैया पाटील कवलखेडकर या दोघांच्या माध्यमातून करण्यात आली. या वेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा वैजापूरे ,राहुल भैया पाटील मलकापूरकर, बामणीचे सरपंच राजकुमार बिरादार , पांढरे काकू , देवणी लिंगायत समाजाचे अध्यक्ष शेषेराव मानकरी, व समाज बांधव खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडी नंतर प्रा नंदकुमार पटणे यांनी मनोगत व्यक्त करताना, मी या दिलेल्या जबाबदारीचे महात्मा बसवेश्वर महाराज यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याचा जो त्यांचा विचार होता, त्याच प्रमाणे मी फक्त लिंगायत समाजच नाही तर सर्व समाजातील छोटे मोठे जे काही माझ्यांने शक्य आहे, ते गोरगरिबांचे अडचणी सोडवण्यासाठी काम करेन, एक सर्व सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असून सर्वसामान्य कुटुंबातील माणसासाठीच मी काम करत राहणार.आणि तुम्ही टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असे नूतन तालुकाध्यक्ष तथा उपसरपंच प्रा. नंदकुमार पटणे गुरधाळकर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
