नागतिर्थवाडी येथे उपसरपंच कै.विष्णूदास गुणाले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

नागतिर्थवाडी येथे उपसरपंच कै.विष्णूदास गुणाले यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

उदगीर (एल.पी.उगीले) : देवणी तालुक्यातील नागतिर्थवाडी येथे मागच्या महिन्यात अपघातात मरण पावलेले गावचे उपसरपंच कै. विष्णुदास विठ्ठल गुणाले यांच्या स्मरणार्थ त्यांची आठवण म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वडाचे व ग्राम पंचायत प्रांगणात आंब्याच्या झाडाचे वृक्षारोपण करून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यात आली. या झाडांच्या रुपात ते आपल्या मध्ये जिवंत राहतील, असा विश्वास गावचे सरपंच राज गुणाले यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी वनविभागाचे वनपाल रघुनाथ तेलंगे, वनरक्षक नामदेव डीगोळे, कमलाकर फुले, गंगाधर गोसावी, गावचे पोलिस पाटील शिवराज कोंबडे, माजी सरपंच तुकाराम पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अश्विनीकुमार गुंजरगे, सह शिक्षिका शारदा गूंगे, ग्रा.प. सदस्या भामाबाई कासले, नारायण गुणाले, नरसिंग गिरी, अंकुश गुणाले, विष्णु येलमटे,नाना पाटील, शिवाजी उंचे, ब्रम्हानंद उंचे,पार्वतीबाई उंचे आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!