अतनूर येथे रब्बी हंगाम पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
अतनूर (एल.पी.उगीले) : अतनुर येथील साईबाबा शेतकरी बचत गट व जळकोट तालुका कृषी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी श्रीराम मंगल कार्यालयात रब्बी हंगाम पेरणी पुर्व प्रशिक्षण संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रशेखर पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाष क्षीरसागर, मंडळ अधिकारी अनिल गीते, कृषी पर्यवेक्षक नानासाहेब धुप्पे, ज्ञानोबा हंगरगे, उपसरपंच बाबूराव कापसे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, कृषी सहाय्यक संदीप पाटील, ग्रा.पं.सदस्य प्रमोद संगेवार, सदस्या संजीवनी गायकवाड, कुणबी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष बी.जी.शिंदे, पत्रकार किशन मुगदळे, बचत गटाच्या सीआरपी वाघमारे , ज्ञानोबा हंगरगे, किरण सोमवंशी, संदीप पाटील, साईनाथ पवार, संतोष नागमोडे, आनंद सोनकांबळे हे उपस्थित होते.
अतनूर येथील आत्मा अंतर्गत स्थापित साईबाबा शेतकरी बचत गट यांच्या पुढाकाराने रब्बी हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, कृषी पर्यवेक्षक ज्ञानोबा हंगरगे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाष शिरसागर, कृषी सहाय्यक संदीप पाटील यांनी हरभरा व करडई पिकांच्या बियाणे वाणाची निवड, जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया, बायोमिक्स चा योग्य वापर तसेच हरभरा पिक लाल पडणे, हरभरा पिकांमधील प्रमुख आळी घाटयाळीचे व्यवस्थापन तसेच करडई पिकावरील मावासाठी निंबोळी अर्कचा वापर करणे, रब्बी ज्वारी वरील चिपटा व ज्वारी काळी पडणे या बाबींचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे, याविषयी उपस्थित शेतकरी व शेतकरीवर्ग सदस्यांना मार्गदर्शन केले. आत्म्याचे तालुका व्यवस्थापक अभिलाष शिरसागर यांनी शेतकरी गटासाठी असणाऱ्या योजनांची माहिती सांगितली, व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांनी संघटित व्हावे. व प्रक्रिया उद्योग उभा करावा, असे आवाहन केले.
तसेच प्रधानमंत्री सुक्षम अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचे संकल्पना त्यासाठी लागणारे कागदपत्रे अनुदानाविषयी माहिती व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे व ज्यांचा जुना उद्योग आहे. त्या शेतकऱ्यांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान केले. यावेळी प्रगतिशील शेतकरी अनिल पत्तेवार यांचा कृषी विभागातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन ईश्वर कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वीतेसाठी साईबाबा शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष शिवराज रेड्डी, सचिव व शेतकरी सदस्यांनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रमाला शिवराज रेड्डी, शकुंतला कापसे, छगनसिंग चव्हाण, प्रेमला रत्नपारखे, सोपान बारसुळे, तानाजी सोमुसे-पाटील, ज्ञानेश्वर संगेवार, वेंकट कलमे, संग्राम रेड्डी, माधव रेड्डी, राम रेड्डी, बाबू बोडेवार, उत्तम बिचकुंदे, गुंडू
बोडेवार, मधुकर पत्तेवार, ज्ञानेश्वर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
