नागतिर्थवाडी येथे ग्रामरोजगार सेवकांचे तालुका स्तरीय प्रशिक्षण
उदगीर (एल.पी.उगीले) : देवणी तालुक्यातील मौजे नागतीर्थ वाडी येथे आज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे ग्राम रोजगार सेवक यांच्यासाठी मनरेगा अंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. नागतिर्थवाडी येथे मनरेगा अंतर्गत क्षेत्र भेट, शिवार फेरी व कुटुंब सर्वेक्षण करण्यात आले,
यातूनच गावचे पुढील वर्षी चे म्हणजे 2023-24 चे समृध्दी बजेट बनविण्यात आले.
यावेळी या प्रशिक्षणासाठी नोडल अधिकारी म्हणून पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही.एस. कांबळे , ए.डी.कट्टेवार विस्तार अधिकारी पंचायत , आर.बी.आलापुरे विस्तार अधिकारी महिला बाल कल्याण, नागतिर्थवाडी येथील तलाठी अनिता निंगुळे ,प्रशिक्षक म्हणून निलेश राठोड ,ज्योतिबा डुक्करे, उमाशंकर वलांडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प.स., विष्णु पवार तांत्रिक सहाय्यक, दिनेश पवार तांत्रिक सहाय्यक, गणेश कासले लिपिक तथा डाटा एंट्री ऑपरेटर मनरेगा प.स. देवणी, म्हेत्रे आनंत ऑपरेटर मनरेगा तहसील देवणी व तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या नियोजन गावचे सरपंच राज गुणाले यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावचे ग्रामरोजगार सेवक हरिश्चंद्र गुणाले, ग्राम पंचायत कर्मचारी शिवाजी उंचे व ब्रह्मानंद उंचे यांनी परिश्रम घेतले.
