परदेशातील हॉटेलमध्ये प्लेसमेंट देण्याचे अमिष दाखवुन हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थाची ४.५०.०००/- रुपयेची आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपींना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद

परदेशातील हॉटेलमध्ये प्लेसमेंट देण्याचे अमिष दाखवुन हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थाची ४.५०.०००/- रुपयेची आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपींना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद

पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २१९/२०२२ भारतीय दंडविधान संहिता कलम ४०६. ४२०.५०४.३४ प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी निशांत जाधव व त्यांचे मित्र नामे वेदांत शिंदे . दानिश मौलवी व शिवम दुबे यांना माहे मार्च २०२१ पासुन ते आजपावेतो ” सक्सेस करियर” कन्सलटन्सीचे तसेच आरोपीत नामे जितेश विलास जाधव वय ४० वर्षे रा. वागळे इस्टेट . ठाणे वेस्ट व राधेशाम मंगळु महाराणा वय ४६ वर्षे रा. अनुराधा बिल्डींग. नागरी निवारा परिसर . गोरेगाव ईस्ट . मुंबई यांनी संगणमत करून फिर्यादी व त्यांचे नमुद मित्र यांचा विश्वास संपादन करून त्यांना परदेशातील हॉटेलमध्ये प्लेसमेन्ट देण्याचे अमिष देवुन फिर्यादी. वेदांत शिदे. दानिश मौलवी यांचेकडुन प्रत्येकी १.००.०००/- रुपये व शिवम दुबे याचेकडुन १.५०.०००/- रुपये स्वीकारुन देखील त्यांना परदेशातील हॉटेलमध्ये प्लेसमेंन्ट न देवुन तसेच त्यांची स्वीकारलेली रक्कम देखील परत न करून त्यांची एकत्रितरित्या एकुण ४.५०.०००/- रुपयेची फसवणुक करून उलट फिर्यादी व त्यांचे नमुद मित्र यांना शिवीगाळ केली. म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा नोंद आहे.

सदर गुन्ह्याचे तपासामध्ये मा. श्री. राजेंद्र डहाळे सो. अप्पर पोलीस आयुक्त. पश्चिम प्रादेशिक विभाग.पुणे शहर. मा. श्री. सागर पाटील सो. पोलीस उपआयुक्त. परिमंडळ ०२. पुणे शहर. मा. सुषमा चव्हाण सो . सहाय्यक पोलीस आयुक्त . स्वारगेट विभाग. पुणे शहर यांचे मार्गदर्शनाने मा. श्री. अशोक इंदलकर सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मा.श्री. सोमनाथ जाधव सो. पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सो. स्वारगेट पोलीस स्टेशन. पुणे शहर यांचे सुचनेनुसार पोलीस उपनिरिक्षक श्री. तुषार भोसले. पोलीस शिपाई / सोमनाथ कांबळे . पोलीस शिपाई/ फिरोज शेख. पोलीस शिपाई/ धिरज पवार व पोशि/ संदीप घुले सर्व नेमणुक स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर व पोहवा / मंगेश बोऱ्हाडे नेमणुक परिमंडळ ०२ कार्यालय . पुणे शहर यांचे पथकाने नमुद आरोपींच्या ठावठिकाण्यांची तांत्रीक विशलेशना द्वारे माहीती काढुन पोलीस उपनिरिक्षक श्री, तुषार भोसले. पोलीस शिपाई / सोमनाथ कांबळे. पोलीस शिपाई/ फिरोज शेख व पोलीस शिपाई / धिरज पवार यांनी नमुद आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणा हुन सापळा रचुन ताब्यात घेतले असता . त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ही मा. श्री. राजेंद्र डहाळे सो. अप्पर पोलीस आयुक्त. पश्चिम प्रादेशिक विभाग.पुणे शहर. मा. श्री. सागर पाटील सो . पोलीस उप आयुक्त . परिमंडळ ०२. पुणे शहर . मा. सुषमा चव्हाण सो . सहाय्यक पोलीस आयुक्त . स्वारगेट विभाग. पुणे शहर. मा. श्री. अशोक इंदलकर सो . वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन. पुणे शहर. मा. श्री. सोमनाथ जाधव सो. पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) सो. स्वारगेट पोलीस स्टेशन . पुणे शहर. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक / तुषार भोसले . पोलीस शिपाई / सोमनाथ कांबळे. पोलीस शिपाई / फिरोज शेख. पोलीस शिपाई / धिरज पवार व पोशि / संदीप घुले सर्व नेमणुक स्वारगेट पोलीस ठाणे पुणे शहर व पोहवा/मंगेश बोऱ्हाडे नेमणुक परिमंडळ ०२ कार्यालय पुणे शहर यांचे पथकाने केलेली आहे.

About The Author