मोठी बातमी : शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण गोठवले

मोठी बातमी : शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण गोठवले

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्हीही गोठवले निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीपुरता महत्त्वाचा निर्णय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील लढाई दोन्ही गटाला मोठा झटका बसला असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आले आहे इतकेच नव्हे तर शिवसेना हे नाव देखील दोन्ही गटांना वापरता येणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांना फार मोठा धक्का बसला आहे नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक निर्णय आयोगाकडे सूचना द्यावयाच्या आहेत त्या सूचनांचा विचार करून निवडणूक आयोग निर्णय घेईल सदरील निकाल हा पोटनिवडणुकीपुरता मर्यादित असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार असल्याची स्पष्ट केले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून गेल्या अनेक दिवसापासून सुनावणी सुरू होती निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता शिंदे गटाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर याबाबतचा निकाल द्यावा म्हणून मागणी केली होती विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते व आपणच खरे शिवसैनिक असून आपलीच सेना खरी आहे असेही सांगितले होते तर ठाकरे गटाकडून आपण सगळे कागदपत्र सादर करून पण आपल्याला पुरेसा वेळ द्यावा अशी मागणी केली होती पण निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला खडे बोल सुनावले होते त्यानंतर दोन्ही गटासाठी 24 तासाचा वेळ देण्यात आला होता अखेर याप्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत सलग चार तास बैठक झाली या बैठकीनंतर आयोगाने चिन्ह गोठवल्याचे जाहीर केले

About The Author