विद्यापीठाच्या युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाने भरवली ‘वेड्यांची शाळा’ गर्दी

विद्यापीठाच्या युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाने भरवली 'वेड्यांची शाळा' गर्दी

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा, नांदेडच्या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवात महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विडंबन हा कलाप्रकार सादर करताना ‘वेड्यांची शाळा ‘ भरवून अलोट गर्दीसह रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

याबाबत अधिक माहिती अशी की नांदेड येथील ग्रामीण पाॅलिटेक्निक तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठस्तरीय ‘ राष्ट्रचेतना युवक महोत्सव – २०२२’ सुरू असून या महोत्सवाचा दुसरा दिवस अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विडंबन या कलाप्रकारात ” येड्याची शाळा” हे विडंबन सादर केले. महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी कलावंतांनी हे विडंबन सादर केले. या विडंबनाला जयवंत दळवी नाट्य मंचासमोरील उपस्थित रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. या विडंबनात रोहन कांबळे, प्रशांत काळे, अमोल बनसोडे, राम पाटील, ज्ञानेश्वर श्रीरामे आणि भागवत भोसले या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विडंबनातून अत्यंत विनोदी शैलीत जागतिकीकरणाच्या काळातील शैक्षणिक दुरवस्था आणि भ्रष्टाचार, अनागोंदी कारभारावर उपहासात्मक भाष्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना संघप्रमुख डॉ. अनिल मुंढे, डॉ. मारोती कसाब,प्रा. सीमा गीते आणि डॉ. अभिजीत मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

error: Content is protected !!