अहमदपूर पुणे परिवाराच्या वतीने शिवकथा उत्साहात संपन्न

अहमदपूर पुणे परिवाराच्या वतीने शिवकथा उत्साहात संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : खरं म्हणजे देव हा प्रत्येक घरी परिवारात येऊ शकत नाही ,त्यामुळे जन्मदाता म्हणजेच माता पिता हे आपल्या घरात देवा समान असतात म्हणून भारतीय संस्कृतीत घराघरात मातापित्यांना अत्यंत सन्मानाची व आदराची वागणूक द्या .असे आग्रही प्रतिपादन भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांनी केले.ते दि.6 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गौरीशंकर मंदिरात कैलासवासी प्रभाकर पुणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त दिव्य शिव कथेच्या समारोपाच्या आशीर्वाचन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी कथा व्यासपीठावर शि भ प शिवकथाकार बाबुराव सोनटक्के महाराज करंजीकर, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी नगराध्यक्ष अश्विनी कासनाळे, माजी सभापती आयोध्याताई केंद्रे, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे,माजी सभापती निळकंठ होनराव पाटील, बाजार समितीचे संचालक अनिल मेनकुदळे ,संचालक सुंदरराव साखरे, माजी नगरसेवक सर्वश्री लक्ष्मीकांत कासनाळे ,अभय मिरकले ,संदीप चौधरी ,एडवोकेट निखिल कासनाळे, आडत व्यापारी दत्तात्रय दराडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आचार्य गुरुराज स्वामी म्हणाले की, माणूस जन्माने मोठा होत नसून तो त्याच्या कार्यामुळे मोठा होतो. भक्तीचा खरा आरंभ श्रोत्याच्या श्रवणात असल्याचे सांगून सर्व कथांच्या मध्ये शिवकथा श्रेष्ठ असल्याचे सांगून ज्ञानाने अहंकार नष्ट होतो .मानवाने मात्र पित्रऋणातून मुक्त व्हावे असे जाहीर आवाहन केले. शिव कथेच्या या पाच दिवशी दुपारी बारा ते चार च्या दरम्यान अत्यंत अभ्यासपूर्ण सुश्राव्य आवाजात सिबप कथाकार बाबुराव सोनटक्के महाराज करंजीकर यांनी अतिशय सुंदर आणि लक्षवेधी कथा सांगून शिव पार्वतीचा विवाह सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न केला. यावेळी मातोश्री श्रीमती सुशीला बाई पुणे यांच्या वजनाच्या प्रमाणे 101 ग्रंथ व भस्म तुला करण्यात आला.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सभापती शिवानंद हेंगणे यांचे पुणे यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी मनोगत पर भाषणे झाली. कवयत्री जयश्री चावरे यांनी शिवकथेवर तयार केलेली कविता सादर केली. प्रास्ताविक सुंदर साखरे यांनी सूत्रसंचलन राम तत्तापुरे यांनी परिचय ओम पुणे यांनी तर आभार राजकुमार पुणे यांनी मानले. या शिवकथेसाठी संगीत संच म्हणून सुहास बेंद्रीकर ,वैजनाथ मुरुडे ,गायक विठ्ठल कुडमे, वादक राच्याया स्वामी लोहगावकर यांची सुंदर साथ होती. या सोहळ्यासाठी आडत व्यापारी गुंडप्पा तत्तापूरे, मारुती देवपूजे, शि भ प राजेश्वर स्वामी लाळीकर, शि भ प विश्वनाथ स्वामी वडवळकर, शिभ प राजकुमार वाघमारे हरंगुळकर, शि भ प लक्ष्मण विभुते, शि भ प विश्वनाथ कल्याणी सताळकर यांच्यासह महिला व शिवप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. शिव कथा यशस्वी करण्यासाठी संयोजक राजकुमार पुणे ,हावगीराव पुणे, सूर्यकांत पुणे, बाबाराव पुणे, बालाप्रसाद पुणे, यांच्यासह मित्रपरिवारानी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!