संत ज्ञानेश्वर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले .विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून संस्था समन्वयक माननीय श्री कुलदीप भैया हक्के व शिवालिका कुलदीप हाके हे होते या प्रदर्शनात एकूण 58 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यात मुलांनी बल व दाब, वॉटर मशीन, अम्ल अमलारी सोलर कार ,इलेक्ट्रॉनिक बॅटरी, अलाराम प्रदूषणविरहित जहाज, ज्वालामुखी इलेक्ट्रॉनिक कार, विद्युत बचत, एअर कुलर, सफाई मशीन, एटीएम मशीन, पाण्याची वाफ ज्वलनासाठी आॕक्सीजन ई अनेक छोटे मोठे प्रयोग सदरीकरण केले व आपआपल्या प्रयोगाची सविस्तर माहिती दिली.प्रयोग पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी रांगेत प्रयोग पाहणी केली .या वेळी कुलदिप हाके व शिवालिका कुलदिप हाके मॕडम यांनी प्रयोगाची पाहणी करुण विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यातून प्रथम ,द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पालक वर्गातून दासराव मोरे यांनी बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका आशा रोडगे ,मु अ उध्दव शृंगारे,सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author