दयानंद महाविद्यालयामुळे भावी आयुष्यातील संस्काराचे धडे मिळाले – न्यायमूर्ती शिवकुमार डिगे

दयानंद महाविद्यालयामुळे भावी आयुष्यातील संस्काराचे धडे मिळाले - न्यायमूर्ती शिवकुमार डिगे

लातूर येथील दयानंद शिक्षण संस्था व विधी व विज्ञान माजी विद्यार्थी यांच्या वतीने न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांचा शानदार सोहळ्यात झाला सन्मान

लातूर (प्रतिनिधी) : लातूरची दयानंद शिक्षण संस्था म्हणजे गुणवत्तेची खाण आणि विद्यार्थ्यांचे भावी उज्ज्वल आयुष्य घडविणारे ज्ञानमंदिर असून संस्थेच्या दयानंद विज्ञान व विधी महाविद्यालयामुळेच मी घडलो. हे आयुष्यातील जगण्याचे माझे ऊर्जास्त्रोत बनले असून भावी आयुष्यातील संस्काराचे धडे याच महविद्यालयामुळे मिळाले असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डीगे यांनी शनिवारी लातूर येथील दयानंद शिक्षण संस्था व विधी व विज्ञान महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळयात बोलताना व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ शिवाजीराव नाकाडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी सचिव रमेश बियाणी संयुक्त सचिव सुरेश जैन कोषाध्यक्ष संजय बोरा, अँड श्रीकांत उटगे, अँड आशिष बाजपाई, सी ए नथमलजी व्होरा, सत्कारमुर्ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डीगे, मंत्रालयातील अप्पर सचिव सौ वैशाली डिगे, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयप्रकाश दरगड विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ पूनम नाथानी, प्रा. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजातील आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य दयानंद शिक्षण संस्थेने केले

पुढे बोलताना न्यायमूर्ती शिवकुमार डीगे म्हणाले की, लातूर शैक्षणिक पॅटर्नची खरी सुरुवात दयानंद शिक्षण संस्थेनीच केलेली असून गुणवत्तेची आणि शिक्षणाची परंपरा येथे प्रदीर्घ अशी राहिलेली आहे पुढेही राहील असे सांगून समाजातील एक जबाबदार आणि आदर्श नागरीक घडविण्याचे प्रभावी असे कार्य ही शैक्षणिक संस्था करते. राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेना आणि महाविद्यालया अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमामुळेच माझ्या आयुष्याची जडणघडण झालेली आहे.चांगले मिञ व नेतृत्वगुणाची संधी दयानंद महाविद्यालयामुळेच मिळाली. त्यामुळे प्रकाशाची योग्य वाट आणि जगण्यासाठीचे योग्य बळ देणारी ही संस्था आहे. माणूस म्हणून सक्षमपणे घडवणारे शिक्षक येथे आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत, अभ्यासू,चिकाटी आणि आत्मविश्वासाने आपले ध्येय व स्वप्न साकार केली पाहिजेत आणि यशाची सर्वोच्च पायरी सर केली पाहिजे.भौतिक सुविधांनी युक्त सुसज्ज इमारत,आकर्षक क्रीडा मैदान,सुंदर परिसर आणि वातावरण असलेल्या या शैक्षणिक संस्थेत आपणही करिअर करावे,असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांनी सत्कार सोहळ्यात बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

दयानंद शिक्षण संस्थेने राज्यात शैक्षणीक क्षेत्रात वेगळा पॅटर्न निर्माण केला – सचिव रमेश बियाणी

यावेळी बोलताना रमेश बियाणी यांनी राज्यात सलग ५ वर्ष बारावीतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून राज्यात शिक्षणाची पंढरी म्हणून दयानंद शिक्षण संस्थेच्या उल्लेख होत असून महाविद्यालयाने जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची भूमिका घेतली हि आमच्या संस्थेची सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य करत आहेत यापुढेही गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे कार्य संस्था यापुढे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच सत्कारमूर्ती न्यायमूर्ती शिवकुमार डी गे यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या माध्यमातुन वेगवेगळ्या शासकिय योजनेतून नागरिकांना आधार देण्याचे सामाजिक कार्य केले असा उल्लेख करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्कारमूर्ती मंत्रालयातील अप्पर सचिव सौ वैशाली डी गे, अँड आशिष बाज पाई, दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयप्रकाश दरगड यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गौरव पत्राचे वाचन प्रा. सांगोले मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन विधी पळसा पुरे यांनी केले.

यावेळी सत्कारमूर्ती न्यायमूर्ती शिवकुमार डीगे व मंत्रालयातील अप्पर सचिव सौ वैशाली डीगे यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन दयानंद शिक्षण संस्था व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास दयानंद शिक्षण संस्थेच्या विविध संस्थांचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विध्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, नागरिक, विधीज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!